Sari Ater सारी एतर
कंपनीची टूर किंवा दरवर्षी होणारे गेट-टुगेदर यंदा सारी एतर ला होणार असे ठरले. मास्टर स्टीलचे दरवर्षी असे गॅदरिंग होत असते. मार्केटिंगचे दोन-तीन लोकांची फक्त नावे माहीत होती परंतु बघू तर अनोळखी लोकांमध्ये कसे ऍडजस्ट करायचे...
सारी एतर हा पिकनिक स्पॉट चांगला आहे हे मला माहित होते. मी यापूर्वीही दोन तीन वेळा येथे गेले होते. कंपनीच्या लोकांबरोबर एक वेगळीच मजा करू ह्या उद्देशाने आम्ही निघालो..
साधारण चाळीस जण होते. एक मोठी बस त्यांनी ठरवली होती .आम्ही दोघे मात्र आमच्या गाडीने निघालो. सर्वजण इंडोनेशियन चायनीज आणि इंडोनेशियन होते. त्यांच्याशी काय बोलणार एक प्रश्नच होता..
आम्ही हाऊ सी गेम बरोबर नेला होता. रात्री तो गेम खेळून खूप मजा आली. सर्वांना बांगड्या गिफ्ट दिल्या. त्यांनाही गमतीशीर वस्तू दिल्या. उदाहरण.. अमृतांजन , बॉल, चॉकलेट, वही, ब्रश ,पेन वगैरे .प्रत्येक वस्तू वेगळ्या पॅकिंग केल्या होत्या. आणि त्यावर वेगवेगळी कॉमेंट्स लिहिल्या होत्या. त्या वाचून सर्वजण खो खो हसत होते. जवळजवळ दीड तास हा गेम चालू होता. .वेगळी भाषा असतानासुद्धा प्रत्येक जण गेम जाणून घेत होता. देश वेगळा, जागा वेगळी, माणसं वेगळी परंतु या हाऊसि मुळे सर्वजण हसत होते आणि आनंद उपभोग घेत होते. सर्वांनाच हा गेम खूप आवडला. वेळही चांगला गेला. सतत लक्षात राहील असे प्रत्येक जण म्हणत होते कंपनीची लॉटरी ही तेथे काढली. ती लॉटरी काढली होती माझ्या हातून. कोणाला व्हिडिडी मिळाला तर कोणाला फोन कोणालाआय पॉड मिळाला तर कोणाला mp3. कोणाला सरप्राईज गिफ्ट अशी वेगवेगळी बक्षीस होती. जेवढी माणसं होती तेवढी वेगळी होती बक्षीस.
खरंतर अशा प्रकारचे गेम, शॉर्ट टूर वर्षातून एकदा तरी व्हायलाच हवे म्हणजे माणूस नव्या जोमाने कामाला लागतो. सर्व कामे बाजूला ठेवून सर्वजण त्यात सहभागी होतात कोणी कोणाचा हेवा दावा करीत नाही. कोणाचे उणे काढत नाही. फक्त मजा हाच एक उद्देश असतो
सारी एतर हे खूप मोठे हॉटेल आहे. प्रत्येक हॉटेलचे एक वैशिष्ट्य असते. येथे हॉट वॉटर स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे आहेत. हॉटेलमध्ये बांबूची घरे आहेत. येथून जवळच जिवंत ज्वालामुखी असल्यामुळे गंधकाचे पाणी गरम होते. आम्ही पण गंधकाच्या गरम झऱ्यात आंघोळ केली. .
ट्रीप म्हटली की टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते. शिस्त पण खूप आवश्यक असते. त्यामुळे एक चार्ट बनवून प्रत्येकाला दिला होता. त्यात प्रत्येक ऍक्टिव्हिटी ची वेळ, जेवणाचे ठिकाण, मेनू तसेच गेम्स दिले होते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार गेम्स खेळत होते. मला नवीन वाटले ते पेन्ट बॉल गेम. प्रत्येक जण आपली बंदूक घेऊन हंटिंग साठी सज्ज होता काहीजण आपले एडवेंचर स्किल दाखवत होते.
. इंडोनेशिया हे ज्वालामुखी साठी प्रसिद्ध आहेच तसेच ते रेन फॉरेस्ट साठी सुद्धा. घनदाट जंगलातून जाताना सुद्धा एक वेगळेच थ्रील येथे जाणवते.
काहीजण ची मजा घेत आपापली शॉपिंग एकमेकांना दाखवत होते हॅट गॉगल शर्ट पर्स
खेळणी वस्तू ….
दिवसभराच्या श्रमाने कोणीही थकले नव्हते उत्साह रात्रीसुद्धा कायम होतामम. थंडी खूप असल्याने छोटीशी होळी पेटवून त्याभोवती गाणी गोष्टी चालू होत्या . चेष्टा विनोद करताना रंगून जात होते. सर्व जण इंडोनेशियन फक्त आम्हीच भारतीय होतो. तरीही आम्हाला ट्रीप मध्ये छान छान मजा आली. मी मात्र भूतकाळात केव्हा गेले कळालेच नाही. सारी एतरची मुलांबरोबर ट्रीप आठवली….
आज माझी सारी एतरला चौथी चक्कर. बांडुंगला जाताना चियातर मार्गे आपण सारी एतरला जाऊ शकतो. इंडोनेशियात प्रवासाचा कंटाळा मात्र अजिबात येत नाही. केव्हाही म्हटले तरी आम्ही फिरायला तयार असायचो.
मी मात्र भूतकाळात कधी गेले कळालच नाही. छोटेसे शुभम समृद्ध डोळ्यासमोर येऊ लागले. आपला स्विमिंग ड्रेस घालून गॉगल घालून ,गरम पाण्याचे झऱ्यात बाबांच्या कडेवर बसलेली….
शुभम ला म्हटले शुभम आज आपण काय पाहिले त्याचे वर्णन लिही आणि चित्र काढ. आपण सूरबायार् ला गेल्यावर शाळेत दाखव. लगेच पठ्ठा बसला चित्र काढायला. चित्र काढून झाले…. सूर्य, डोंगर, झाडी, पाणी, घर, रस्ता. “ आई हे बघ माझे चित्र .मी आता रंगवू का? मी हो म्हणले. त्याने फक्त तिन रंग घेतले. व सर्व चित्र रंगवलेले. आकाश, पाणी निळे आणि डोंगर सर्व हिरवे रंगवले. त्यावर मी म्हटलं “अरे शुभम हे काय केलेस?” डोंगर वेगळ्या असतात असे नाही का ? शुभम चे उत्तर तयार होते . “आई बाहेर बघ सर्व हिरवे डोंगर आहेत. म्हणून मी हिरवे रंगवले .”मी स्तब्ध झाले.
खरंच त्याचे काही चुकलं नव्हतं हिरवेगार डोंगर दिमाखात उभे होते. आकाशात फक्त फिक्कट निळा व हिरवा रंग एवढीच छटा दिसत होती. पु ल देशपांडे यांचे वर्णन आठवले. त्यांनी “अपूर्वाई” या पुस्तकात इंडोनेशियाचे वर्णन
पाचूचे बेट असेच केले आहे.
ट्रीप म्हटली की मुलांची गडबड सुरू व्हायची. दोघेही आपली सॅक घेऊन रेडी .आई माझा बायना कोलर कुठेआहे? मला पेन्ट बॉल गेम खेळायचा आहे. आई मला सुद्धा बायना कोलर पाहिजे. समृद्ध पण मागे लागायचा. असे वाटायचे मुले कधीच मोठी होऊ नयेत. त्यांचा तो हट्ट आपले रागावणे व नंतर परत त्यांना वस्तू घेऊन देणे किती मजा असते...
400 ते 500 किलोमीटरचा प्रवास अवघा दीड दिवसात करून आल्यावर मला वाटले आता आपण फक्त अर्धा दिवस आराम करूयात. पण कसले…? तशी आवश्यकताच वाटली नाही.
सारी एतर हॉट स्प्रिंग रिसॉर्ट ची माहिती
सारी एतर हॉट स्प्रिंग रिसॉर्ट हॉटेल व कन्व्हेन्शन सेंटर आणि रिक्रिएशन सेंटर आहे.
हे सुबंग च्या जवळ चीयातर ला आहे.
चीयातर व्हॅली तानकुबानप्राहूजान डोंगराच्या पायथ्याशी आणि चहाच्या मळ्यात मध्ये वसलेली आहे.
डोंगरावर असल्याने तेथील तपमान १७ ते 23 डिग्री.
गरम पाण्याचे झरे नॅचरल सोर्स तापमान 34 ते 46 डिग्री व थर्मल तलाव Hot Water Pool) तापमान 40 ते 42 डिग्री.
बांडुंग पासून ३२ किलोमीटरवर आहे . ४५ मिनिटे लागतात.
जकार्ता पासून अंतर 185 किलोमीटर आहे ट्रॅफिक नुसार तीन ते पाच तास लागतात.
WATCH OUR YOUTUBE CHANNEL CLICK HERE
No comments:
Post a Comment