कचक डान्स
 |
Kecek Dance in Bali |
कचक डान्स मधील सर्व कथा रामायणातली असते .राम वसीता यांच्या प्रेमाचे किंवा राम लक्ष्मण यांच्या पराक्रमाच्या गोष्टी असतात. सीता हरण, सीता स्वयंवर असे विषय असतात. कचक हा एक वेगळ्या प्रकारचा डान्स आहे . यात मध्यभागी होळी केली जाते व त्याचे भोवती नाच करतात. जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचा हा सामुदायिक नाटक असतं. नृत्य किंवा ड्रामा करताना चक चक असा तोंडाने आवाज काढून पार्श्वसंगीत दिले जाते. मध्यभागी होळीच्या भोवती गोल गोल आकारामध्ये हे उघडे लोक बसतात जसं काही हे माकडच आहेत . माकडा सारख्या ॲक्शन घेऊन हे चक चक चक करत असतात. सगळ्या लोकांची ऍक्शन सारखीच असते व आवाज सारखा असतो त्यामुळे मजा येते .अंगात लुंगी व कानावर चाफ्याचे फूल एवढाच त्यांचा पोशाख असतो. होळी भोवती गोलाकार करून ते नाचतात व हातवारे करत कृत्य करतात. यांच्या मध्यभागी नंतर एकेक सीता, राम,लक्ष्मण, रावण व हनुमान असे एक एक पात्र वेग वेगळे ड्रेसमध्ये अवतरतात. रामायणातील सीता हरण, सीता स्वयंवर किंवा लंका पेटवली अशाप्रकारे प्रात्यक्षिक दाखवले जातात. सर्वात शेवटी आगीवर हनुमान नाचतो जसं काही तो सर्व लंकेला आग लावतो आहे. परंतु हे आग लावलेले दाखवताना सर्व प्रेक्षकांची काळजी घेतली जाते. सर्वात शेवटी पूजा केली जाते व कार्यक्रम समाप्त होतो.
कचक डान्स हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान होतो कारण नंतर शेवट हा लंका पेटवून होत असल्यामुळे रात्रीत ते बघायला मजा येते. हा डान्स बऱ्याच ठिकाणी चालतो. प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य वेगळे आहे . उलुवतू मंदिरा जवळ हा डान्स जास्त प्रसिद्ध आहे कारण सूर्यास्तही त्याचवेळेला तेथे होतो व ते छान जुळते. एकीकडे कचक डान्स तर दुसऱ्या बाजूला समुद्र आणि सूर्यास्त अशी दोन-दृश्ये एकाच वेळा बघायला मिळतात
.Watch our U Tube Channel Deepasth click here
No comments:
Post a Comment